NCB VS Sameer Wankhede Special Report : समीर वानखेडे VS एनसीबी वादाला फोडणी, चौकशी सुरु
abp majha web team | 21 May 2023 11:09 PM (IST)
एनसीबीचे मुंबई विभागाचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडेंचा पाय दिवसेंदिवस खोलात जातोय. वानखेडे यांची आज दुसऱ्या दिवशीही सीबीआयने पाच तास चौकशी केली. आजच्या चौकशीत वेगवेगळी माहिती पुढे आलीय. वानखेडेंनी शाहरुख खानसोबत केलेल्या चॅटची वरिष्ठांना कधीही माहिती दिली नव्हती, असा दावा एनसीबीने केलाय. खोटे पुरावे सादर करून वानखेडे तपासाला चुकीची दिशा देत असल्याचा आरोपही एनसीबीने केलाय. एकुणच काय तर एनसीबी विरुद्ध वानखेडे असा नवा संघर्ष पेटलाय