Jain Muni on Tararani : ताराराणींचा अवमान, जैन मुनींमध्येच घमासान Special Report

महाराणी ताराबाईंबद्दल जैन मुनींनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज दिवसभर उमटले. हे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मुनींना आणखी एका जैन मुनींनीच फैलावर घेत माफी मागण्याचा सल्ला दिला. ताराराणींच्या माहेरचे वंशजही संतप्त झाले आणि त्यांनी जैन मुनींच्या वक्तव्याचा निषेध केला. विरोधकही या मुद्द्यावरून आक्रमक झाले, तर सत्ताधाऱ्यांनी मात्र या विषयावरून शांत राहणंच पसंत केलं. पाहूया, आज दिवसभरात नेमकं काय घडलं, याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट.
जैन मुनी विरुद्ध जैन मुनी.
महाराष्ट्रात या वादाला तोंड फुटलं ते जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी मंगळवारी केलेल्या एका विधानानं.
मुंबईत आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम होता महावीर जयंतीचा.
पण मुनी घसरले मराठ्यांच्या इतिहासावर.
आणि महाराणी ताराबाईंना जैन ठरवून मोकळे झाले.
आता असे अकलेचे तारे तोडणाऱ्या या मुनींचे कान टोचले ते एका जैन मुनींनीच...ते म्हणजे आचार्य निलेशचंद्र यांनी...
महाराणी ताराराणींच्या इतिहासाचे संदर्भ देत त्यांनी माफी मागण्याचा सल्ला दिलाय.