Navneet Rana यांना Y Plus Security , राज्याशी पंगा घेतल्यावरच मिळते केंद्राची सुरक्षा?
abp majha web team | 14 Apr 2022 12:19 AM (IST)
अमरावती : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना केंद्र सरकारनं वाय प्लस दर्जाची सुरक्षा जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून नवनीत राणा आणि स्थानिक पोलिस यांच्यात वादाचे पडसाद उमटत असतानाच केंद्रानं ही सुरक्षा व्यवस्था जाहीर केली आहे. त्यामुळे या पाठीमागे नेमका काय राजकीय संदेश आहे याची चर्चा रंगली आहे.