बिहार निवडणूक निकाल 2025
(Source: ECI | ABP NEWS)
Navjot Singh Sidhu Resign: सिद्धूंच्या गुगलीनं काँग्रेसची गोची? Special Report
एबीपी माझा वेब टीम Updated at: 28 Sep 2021 09:32 PM (IST)
Navjot Singh Sidhu Resign: नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र, आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ते काँग्रेस पक्षाचे सदस्य राहतील. आज पंजाबमध्ये नवीन मंत्र्यांचे खातेवाटप झाले आहे आणि काही तासांनंतर सिद्धू यांनी सोनिया गांधींना आपला राजीनामा पाठवला. यामागे काही महत्वाची कारणे आहेत. दरम्यान, माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे दिल्लीसाठी रवाना झाले असून ते आज संध्याकाळी अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. या राजीनाम्याला याचीही किनार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.