गंगाधरी गावातील शिक्षकाचा उपक्रम, ओसाड माळरानावर फुलवलं नंदनवन, 14 वर्षात 15 हजार झाडांची लागवड
अजय सोनावणे, एबीपी माझा | 02 Aug 2021 08:48 PM (IST)
प्रत्येक व्यक्तीला काहीना काही छंद असतो, तर कोणी एका ध्येय डोळ्यासमोर लक्ष ठेवत वाटचाल करीत असतो. नाशिकच्या नांदगाव जवळच्या गंगाधरी येथिल शिक्षक गोरख जाधव हे त्यातील एका गावाजवळील ओसाड असलेल्या टेकडी 14 वर्षात प्रत्येक वेळी झाड लावत त्यांचं संगोपन केलं आणि ओसाड माळरानाच रुपांतर आज नंदनवनात झालंय.