Nashik Pune Toll Special Report : नाशिक पुणे मार्गावर ड्युप्लिकेट पावती? डुप्लिकेट टोलचा झोल?
abp majha web team | 08 Aug 2022 06:05 PM (IST)

बातमी टोलनाक्यांवर सुरु असलेल्या टोलधाडीची. टोल नाके तोटा दाखवण्यासाठी शासनाची फसवणूक करत असल्याचं एबीपी माझाच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झालंय... काही दिवसांपूर्वी "I am the father of the toll" असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं होतं... पण आता सुरु असलेली टोलधाडीमुळे सरकारचा वचक कमी झालाय का असा प्रश्न उपस्थित होतो... एबीपी माझानं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावर असणाऱ्या हिवरगाव टोल नाक्यावर मुख्य सिस्टिम बंद असल्याचं सांगत हॅन्ड मशीन वापरुन टोल वसुली करत असल्याचं समोर आलाय... नेमका हा प्रकार काय आहे पाहुयात.