Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report

नाशिक... महाराष्ट्रातली कुंभनगरी... सध्या नाशकात युद्धपातळीवर कुंभमेळ्याचं काम सुरू आहे... त्यासाठी गिरीश महाजन यांची कुंभमेळा मंत्री म्हणून नियुक्ती देखील करण्यात आलीय. मात्र कुंभमेळ्याच्या कामात मग्न झालेल्या सरकारकडे आणि प्रशासनाकडे नाशकातल्या जीवघेण्या खड्ड्यांकडे पाहायला वेळ नाहीय का? असा सवाल आता सगळेच विचारताहेत... कारण पाच महिन्यांत पाच नाशिककरांना खड्ड्यांमुळे जीव गमवावा लागलाय... कॅबिनेटमध्ये नाशकातले एवढे मंत्री असून नाशिकची ही अवस्था का आणि कुणामुळे? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी पाहुयात एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट...
नाशिकमधल्या खड्ड्यांसाठी आणि त्या खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूसाठी....
छगन भुजबळांनी गिरीश महाजन आणि महापालिका आयुक्तांना जवळजवळ आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय..
आता गिरीश महाजन नाशकातल्या खड्ड्यांची आणि त्या खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारणार का?