Naresh Arora Action : कारवाईचा अलार्म, सल्लागाराला घाम! अजित पवारांचे सल्लागार क्राईम ब्रँचच्या रडारवर Special Report

Naresh Arora Action : कारवाईचा अलार्म, सल्लागाराला घाम! अजित पवारांचे सल्लागार क्राईम ब्रँचच्या रडारवर Special Report
नरेश अरोरा....
हे नाव महाराष्ट्राला आता चांगलंच माहित झालंय...
अजित पवारांचे राजकीय सल्लागार आणि डिझाईन बॉक्स कंपनीचे सर्वेसर्वा...
ज्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा रंग गुलाबी केला
आणि अरोरांच्या स्ट्रॅटेजीनं विधानसभेच्या मैदानात
दादांच्या राष्ट्रवादीनं गुलालही उधळला
मात्र हेच नरेश अरोरा क्राईम ब्रँचच्या रडारवर आले
आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या...
क्राईम ब्रँचची टीम नरेश अरोरांच्या
पुण्याच्या खराडीतील डिझाईन बॉक्स कंपनीच्या ऑफिसमध्ये पोहोचली
मात्र ही कारवाई नेमकी कोणत्या कारणांमुळे करण्यात आली हे गुलदस्त्यातच राहिलं
कोण आहेत नरेश अरोरा?
-------------------------------------
नरेश अरोरा हे
एक प्रसिद्ध राजकीय
रणनीतीकार
'डिझाइन बॉक्स' या
निवडणूक व्यवस्थापन
कंपनीचे सहसंस्थापक
अजित पवारांचे
राजकीय सल्लागार
२०२४ च्या विधानसभा
निवडणुकीत राष्ट्रवादी
पक्षासोबत काम
अजित पवारांच्या
प्रचारासाठी खास
राजकीय कॅम्पेन
राष्ट्रवादीच्या राजकीय
कॅम्पेनमध्ये गुलाबी रंगाच्या
समावेशाची मोठी चर्चा
अजित पवारांआधी
डी. के. शिवकुमार,
अशोक गेहलोत अशा
नेतेमंडळींसाठी काम