Narendra Modi Mumbai Doura Special Report :नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर,दौऱ्यातून पालिकेचा मेगाप्लॅन?
abp majha web team | 10 Jan 2023 11:27 PM (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी १९ जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो टू ए आणि मेट्रो सेव्हन मार्गांचं लोकार्पण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातल्या सत्तांतरानंतर पंतप्रधान मोदींची ही पहिलीच मुंबई भेट आहे. त्यानिमित्तानं भाजपनं मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी कंबर कसल्याचं दिसून येत आहे. मोदींच्या या दौऱ्यातून भाजप मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकणार असल्याचं बोललं जात आहे. पाहूयात एबीपी माझाचा खास रिपोर्ट.