Narendra Dabholkar Special Report : पुरोगामित्वाच्या आवाजाची हत्या, 10 वर्षात काय काय घडलं?
abp majha web team
Updated at:
20 Aug 2023 11:28 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNarendra Dabholkar Special Report : पुरोगामित्वाच्या आवाजाची हत्या, 10 वर्षात काय काय घडलं?
पुरोगामी चळवळीचे पुरस्कर्ते आणि अंधश्रद्धेवर प्रहार करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा आज दहावा स्मृतीदिन. डॉक्टर दाभोलकरांच्या हत्येला आज १० वर्षे पूर्ण झालीत. दुर्दैवाने दाभोलकरांचे मारेकरी कोण हे १० वर्षांत अजून स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला पुणे पोलिसांनी केला. त्यानंतर सीबीआयकडे तपासाची सूत्रे गेली. पण सूत्रधाराकडे पोहोचण्यात कुणालाही यश आलं नाही. २० ऑगस्ट २०१३ रोजी मॉर्निंग वॉक करत असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी दाभोलकरांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. विठ्ठल रामजी शिंदे पुलावर दाभोलकरांची हत्या झाली. आज याच पुलावरून निर्धार रॅली काढण्यात येतेय.