✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Special Report: शिवसेनेला जय महाराष्ट्र करताना Subhash Sabane भावूक;नाराजांसाठी भाजपचा एकमेव पर्याय?

एबीपी माझा वेब टीम  |  03 Oct 2021 11:56 PM (IST)
ABP News

नांदेड : शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे (Subhash Sabane)हे उद्या भाजपमध्ये (BJP)प्रवेश करणार आहेत. देगलूर पोटनिवडणुकीसाठी साबणेंना भाजपकडून तिकीट दिलं जाणार असल्याचं समोर आलं आहे.  पंढरपूर पोटनिवडणुकीतही 2014 मध्ये ज्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली त्या समाधान आवताडेंना भाजपनं तिकीट देत निवडून आणलं होतं. आता त्यामुळं या निवडणुकीकडेही सर्वांचं लक्ष लागून आहे. साबणे उद्या चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत भाजपमधे प्रवेश करणार आहेत. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील यांच्या घरी सुभाष साबणे आले. तिथं त्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांची भेट घेतली. 


नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस राज्य निवड मंडळाने दिवंगत काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश रावसाहेब अंतापूरकर यांना उमेदवारी द्यावी, अशी पक्षश्रेष्ठींकडे शिफारस केली आहे. जितेश हे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव आहेत. रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनामुळे अकाली निधन झाल्यामुळे देगलूर बिलोली मतदारसंघाची पोटनिवडणुक लागली आहे.


शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी अतिवृष्टी नुकसान पाहणी दौऱ्यावर असणारे देवेंद्र फडणवीस यांची देगलूर-बिलोली मतदारसंघाच्या पोटनिवडणूक उमेदवारी संदर्भात नायगाव - नरसी येथे भेट घेतली. त्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे हे भाजपावाशी होणार हे निश्चित झालंय. महाविकास आघाडीचे नेते तथा बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या एकाधिकारशाहीमुळे व शिवसेनेला विश्वासात घेतलं जात नसल्यामुळे शिवसेना सोडून भाजपात जात असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. शिवसेनेशी भावनिक नातं सोडताना दुःख होतंय, असं सांगताना सुभाष साबणे यांच्या डोळ्यात पाणी आलं.


त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण युती धर्म पाळत नाहीत व आम्ही काँग्रेसला मतदान करत नाही म्हणून मी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला असून उद्या भाजपात प्रवेश करून देगलूर बिलोली निवडणुकीसाठी निवडणूक रिंगगणात उतरणार असल्याचे ते म्हणाले. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Special Report: शिवसेनेला जय महाराष्ट्र करताना Subhash Sabane भावूक;नाराजांसाठी भाजपचा एकमेव पर्याय?

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.