BE Positive | नागपुरातील प्यारे खान यांच्याकडून स्वखर्चाने ऑक्सिजन पुरवठा; अनेकांना जीवनदान
सरीता कौशिक, एबीपी माझा | 21 Apr 2021 12:38 PM (IST)

कोविडच्या पहिल्या लाटेमध्ये आपण मानवीय दृष्टिकोन ठेवणारे अनेक एनजीओ आणि नागरिकांना गरजू, मजूर, गरीब यांच्या खाण्याची, घरवापसीची सोय करताना बघितले. मात्र ह्या खेपेला गरज आहे ती म्हणजे ऑक्सिजन सिलेंडर आणि रेमडेसिवीर सारख्या इंजेक्शनची. सध्या जो ऑक्सिजन देईल त्याला देवमाणूसच म्हणावे लागेल आणि अशी पहिली गोड बातमी उपराजधानी नागपूरसाठी आणली आहे प्यारे खान ह्या नागरिकाने.