Nagpur Government Office Special Report : सरकारी काम आणि बारा महिने थांब!
abp majha web team
Updated at:
10 Nov 2022 12:01 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपाच दिवसांचा आठवडा असलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची कार्यालयीन वेळ पावणे दहा वाजता सुरु होते. त्यांनी साडे नऊ वाजता कार्यालयात पोहोचून पावणे दहा वाजता रिपोर्टिंग करणं अपेक्षित आहे. पण नागपूरच्या जिल्हा परिषद कार्यालयात एबीपी माझानं पडताळणी केली तेव्हा ५० टक्के कर्मचारी सव्वा दहा वाजले तरी कार्यालयात पोहोचत होते. काही लेटलतीफ तर साडे दहा वाजल्यानंतर कार्यालयात पोहोतले. एबीपी माझाचा कॅमेरा पाहून काही कर्मचाऱ्यांनी फोनाफोनी सुरु केली. अनेकजण कॅमेरा चुकवून कार्यालयात जाण्यासाठी धडपड करत होते