Nagpur Flood : अंबाझरी तलाव फुटणार? तलावाच्या भिंतींना तडे; पावसामुळे मातीही खचली Special Report
abp majha web team
Updated at:
25 Sep 2023 11:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशनिवारी नागपूरमध्ये आलेल्या जलप्रलयाने शेकडो कुटुंबांची स्वप्न अक्षरश: वाहून गेली. या महापुराने पाचजणांचं आयुष्य वाहून गेलंय. पण त्या चिखलातून संसार बाहेर काढताना आता नागपूरकरांच्या डोळ्यांत अश्रूंसोबत प्रचंड दहशतही साचलीय. आणि या दहशतीचं नाव आहे अंबाझरी तलाव... ८ टीएमसी क्षेत्रफळ आणि २८ हेक्टरमध्ये पसरलेला अवाढव्य तलाव... नागपूरची तहान भागवणाऱ्या याच तलावाने आता नागरिकांच्या तोंडचं पाणी पळवलंय... नेमकं काय झालंय या तलावाला आणि त्याची सध्याची अवस्था काय आहे... पाहूयात या रिपोर्टमधून...