Nagpur Clash Ground Report :संचारबंदी हटली, बंदोबस्त कायम; नागपुरातून ग्राऊंड रिपोर्ट Special Report

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App## नागपूरमधील संचारबंदी उठवली, वातावरण शांत
औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये गेल्या सोमवारी मोठा हिंसाचार घडला. याच हिंसाचारानंतर नागपूरमध्ये अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली होती. पण आता नागपुरातले तणावाचे वातावरण हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे प्रशासनाने सहा दिवसांनंतर संचारबंदी हटवण्याचा निर्णय घेतला. संचारबंदी हटवल्यानंतर नागपुरातल्या परिस्थितीचा घेतलेला हा आढावा.
दुकानांची शटर उघडली. कुणी सलूनमध्ये जाऊन दाढी केली, तर कोणी खरेदीसाठी बाहेर पडले. गेले सहा दिवस नागपुरातल्या वेगवेगळ्या भागात असलेली संचारबंदी अखेर सहा दिवसांनी पूर्णपणे उठवण्यात आली. नागपूर शहरामध्ये ज्या चार पोलीस स्टेशन हद्दीमध्ये संचारबंदी होती, ती संचारबंदी पूर्णपणे हटवण्यात आलेली आहे.
सध्या मी चटणवीस पार्क चौकामध्ये आहे. आपण बघू शकतो की हळूहळू दुकान उघडायला सुरुवात झालेली आहे. आणि आपण जर का बघितलं तर एकंदरीतच या दुकानामध्ये मागच्या सहा दिवसापासून जो लॉक लागला आहे, तो तीन वाजेपासून उघडला आहे. सध्या परिस्थिती सामान्य आहे, नॉर्मल आहे. आम्ही पाहतोय, आमचे सगळे अधिकारी फिल्डवर आहेत, आम्ही पण फिल्डवर आहे, हे सगळं बघतोय आणि सगळ्यांना आव्हान करतोय की कोणी कायदा हातात घेऊ नये. जर काही बोलायचे असलं तर आमचे अधिकारी, कर्मचारी रोडवर आहेत, पोलीस स्टेशनमध्ये ते जाऊन सांगू शकता.
मुख्यमंत्री फडणविसांनीही नागपूरमधल वातावरण निवडल असल्याचं जाहीर केलं. परिस्थिती अतिशय शांततापूर्ण आहे. कुठेही त्याठिकाणी तणाव नाही. सर्व धर्मीय लोक नीट एकत्रितपणे राहत आहेत, त्यामुळे संचारबंदीची आवश्यकता नाही म्हणून ती हटवण्यात आली.
सहा दिवसांनी बाजारपेठा उघडल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पण संचारबंदीमुळे व्यापाऱ्यांना मोठं नुकसानही सहन करावे लागले. आता सध्या तरी शांत आहे वातावरण. अगोदरचा माहोल एकदम गरम होता खूप. आणि नेमकं त्या दिवशी माझं दुकानदार...