Nagpur Bomb Special Report : नागपुरात घातपाताचा प्रयत्न, बॉम्बशोधक पथकाकडून स्फोटकं डिफ्यूज
abp majha web team
Updated at:
10 May 2022 10:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूरच्या रेल्वे स्थानकावर सापडलेले स्फोटक लो इंटेन्सिटी म्हणजेच कमी क्षमतेचे स्फोटक होते असा दावा जरी नागपूर पोलीस करत असले. तरी या प्रकरणाच्या आतापर्यंतच्या तपासातून जी माहिती समोर येत आहे, ती डोळ्यात अंजन घालणारी आहे. मिळालेल्या माहिती प्रमाणे रेल्वे स्थानकाच्या प्रवेश दारा जवळ एका बॅग मध्ये सापडलेल्या स्फोटकांमध्ये १ बायकेट स्ट्रिप, ३.३३ मीटर सेफ्टी फ्यूज आणि ५४ डेटोनेटर आढळले आहे. साधारणपणे हे साहित्य सैन्याकडून त्यांच्या सैनिकांना स्फोटांच्या आवाजाचा सराव व्हावा यासाठी वापरले जातात, त्यामुळे सैन्याच्या सरावासाठीचे हे स्फोटक तर नाही ना आणि ते बाहेर कसे आले असे प्रश्न निर्माण झाले आहे