Nagpur Commissioner Name Plate : पगारावर समाधानी, अधिकारी अभिमानी Special Report
मी माझ्या पगारावर समाधानी आहे
राजेश खवले यांनी नेम प्लेटवर आपल्या नावापेक्षा आणि हुद्द्यापेक्षा या वाक्याला जास्त महत्त्व दिलंय..
टेबलवर म्हणा किंवा टेबलाखालून..
आपल्या कक्षात कोणत्याही भ्रष्टाचाराला थारा नाही.. हे अधोरेखित करण्याचा महसूल अप्पर आयुक्त राजेश खवलेंचा हा क्रिएटिव्ह प्रयत्न...
राजेश खवलेंची ही नेमप्लेटचं आणि या नेमप्लेटमध्ये दडलेला मतितार्थ... दोन्ही गोष्टी सर्वांना भावताहेत
आता राजेश खवलेंना ही नेमप्लेट लावण्याची का वेळ आली असावी?
कारण प्रत्येक सरकारी कार्यालयात टक्केवारीवाली गँग चांगलीच फोफावली आहे..
सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी लाच घेतानाचा व्हिडीओ मनसे नेते संदीप देशपांडेंनी समोर आणलाय
सध्या कार्यालयात भ्रष्टाचाराचा कोणता पॅटर्न सुरू आहे? ते देखील संदीप देशपांडेंकडून ऐकुयात
एकीकडे पगारावर सुखासमाधानाचं आयुष्य जगण्याचं धोरण ठेवणारे प्रामाणिक अधिकारी...
तर दुसरीकडे पगाराबरोबरच टक्केवारीच्या रूपात स्वतःचे खिसे भरणारे भ्रष्ट अधिकारी
एकाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे तर दुसऱ्याला जेवढे चाबकाचे फटके मारावे तेवढे कमी आहेत..
मुंबईहून इशान देशमुखसह रजत वशिष्ठ एबीपी माझा नागपूर