Special Report | वांद्र्याच्या जॉगर्स पार्कमधल्या मोनोलिथचं गूढ
अभिषेक मुठाळ | 14 Mar 2021 08:18 PM (IST)
मुंबईच्या वांद्रे परिसरातील जाॅगर्स पार्कमध्ये अचानक एक मोनोलिथ आढळून आलाय. आता हे ऐकल्यावर तुम्हाला पडणारा पहिला प्रश्न असेल की, मोनोलिथ म्हणजे काय? मंडळी, मोनोलिथ म्हणजे एक अखंड दगडी शिळा किंवा धातूचा स्तंभ. पण वांद्रे येथील जॉगर्स पार्कमध्ये एका रात्रीत मोनोलिथ कोणी उभा केला? कशासाठी उभा केला? आणि त्याचा परग्रहावरच्या जीवसृष्टीशी काही संबंध आहे का? असे प्रश्नही आता अनेकांच्या मनात उभे राहिले आहेत. पाहूयात आमचा प्रतिनिधी अभिषेक मुठाळचा रिपोर्ट.