Maharashtra : सत्याचा मोर्चानंतर गुन्हे दाखल करण्यावरुन राजकीय नाट्याचा दुसरा अंक Special Report
abp majha web team | 02 Nov 2025 10:06 PM (IST)
मुंबईत महाविकास आघाडी (MVA) आणि मनसेच्या (MNS) 'सत्याचा मोर्चा' (Satya Cha Morcha) आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपच्या (BJP) 'मूक आंदोलनामुळे' (Mook Andolan) राजकीय वातावरण तापले आहे. दोन्ही आंदोलनांना परवानगी नाकारलेली असतानाही, मविआ-मनसेच्या आयोजकांवर तातडीने गुन्हा दाखल झाला, तर भाजपवर कारवाईस विलंब झाल्याने नवा वाद पेटला आहे. 'गृह विभाग मंत्रालयातून नाही तर भाजपच्या कार्यालयातून चालतो की काय?', असा संतप्त सवाल विरोधकांनी केला आहे. मतदार यादीतील गोंधळाच्या मुद्द्यावरून मविआ आणि मनसेने एकत्र येत सरकार आणि निवडणूक आयोगाला लक्ष्य केले. यानंतर पोलिसांनी मविआ-मनसे आयोजकांवर बेकायदेशीर जमाव जमवणे आणि प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. मात्र, भाजपच्या आंदोलनावर कारवाई करण्यास दिरंगाई झाल्याने, पोलिसांनी राजकीय दबावाखाली काम केल्याचा आरोप ठाकरे गट आणि मनसेने केला आहे, अखेरीस टीकेनंतर भाजप नेत्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला.