MVA Loksabha Seat Sharing : 40 जागांचा तिढा सुटला, आठ जागांचा गुंता कायम? Special Report

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMVA seat sharing formula मुंबई : महाविकास आघाडीच्या (MVA seat sharing formula) लोकसभेच्या 40 जागांवर अंतिम निर्णय झाल्याचं सांगण्यात येत आहे. या 40 जागांमध्ये कोणाला कोणता मतदारसंघ हे जवळपास निश्चित झालं आहे. मात्र अजूनही 8 जागांवरून तिढा कायम आहे. या 8 जागांवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना (Shiv Sena) आणि काँग्रेसमध्ये (Congress) वाटाघाटी सुरु आहेत. त्यातच प्रकाश आंबडेकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचाही महाविकास आघाडीत समावेश असल्याने, त्यांच्या पक्षांनाही एक एक जागा देण्यात येणार आहे. या दोन्ही जागा सध्या तरी ठाकरेंच्या वाट्यातून देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
महाविकास आघाडीच्या बैठकीत राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 40 जागांवर कोणता पक्ष निवडणूक लढवणार हे जवळपास फायनल झाल्याचं सांगण्यात आलं. तर उर्वरित 8 जागांचा तिढा अद्याप कायम आहे. या जागांमध्ये रामटेक, हिंगोली, वर्धा, भिवंडी, जालना आणि शिर्डी यांचा समावेश आहे जिथे शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस दावा करत आहेत. याशिवाय काँग्रेस पक्ष मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघ आणि मुंबई उत्तर पश्चिमच्या जागा मागत आहे. मात्र 2019 मध्ये दोन्ही जागांवर शिवसेना विजयी झाली होती. उद्धव ठाकरे गट दोन्ही जागा सोडण्यास तयार नाही.