Mumbai Traffic : वाहतूक कोंडीने मुंबईकरांच्या वेगाला ब्रेक, माहीम कॉजवेच्या पुलाचं नुतनीकरण
abp majha web team | 10 Aug 2023 07:19 AM (IST)

मुंबई म्हणजे घड्याळ्याच्या काट्याशी शर्यत करणारं शहर. या शहरात वाहतुकीच्या नवनव्या सुविधा निर्माण होत असल्या तरी, शहराच्या वाढत्या पसाऱ्याला त्या कमीच पडतात. त्यामुळं मुंबईत सतत काहीतरी वाहतुकीच्या नवनव्या सोयसुविधा होत असतात. पण त्या पूर्ण होईपर्यंत मुंबईच्याच वेगाला ब्रेक लागतो. असाच काहीसा प्रकार यंदाच्या पावसाळ्यानंतर माहीम कॉजवेला होण्याची शक्यता आहे. कारण मिठी नदीवरील माहीम कॉजवेच्या पुलाच्या नूतनीकरणाचं आणि रस्ता रुंदीकरणाचं काम मुंबई महापालिका हाती घेणार आहे. पाहूयात एबीपी माझाचा खास रिपोर्ट.