Mumbai Pune Expressway Missing Link Traffic : उद्घाटनाचा घाट...का अडवली वाट? Special Report

असंख्य अडथळ्यांवर मात करून मुंबई-पुणे दरम्यान मिसिंग लिंकची निर्मिती करण्यात सरकार यशस्वी ठरलं खरं... मात्र या प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं योग्य नियोजन करण्यात सरकार अपयशी ठरलं... हे आम्ही नाही, तर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून आज ज्यांनी ज्यांनी प्रवास केला ती मंडळी म्हणताहेत...कारण सलगच्या सुट्ट्या आणि त्यात मिसिंग लिंकच्या उद्घाटनासाठी बंद करण्यात आलेली एक लेन... यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अभूतपूर्व वाहतूकोंडी पाहायला मिळाली... उद्यापासून मिसिंग लिंकवरून प्रवास करताना कदाचित सरकारचं कौतुक होईल... आज मात्र ट्रॅफिक जॅममुळे सरकारला जनतेच्या लाखोल्यांचं धनी व्हावं लागलंय...
मिसिंग लिंकच्या उद्घाटनाआधी एक्स्प्रेस वे जाम
उद्घाटनाची वेळ चुकली? वाहतूककोंडीमुळे प्रश्न उपस्थित
रणरणतं ऊन, बंद पडलेली वाहनं आणि मनस्ताप
ट्रॅफिक जाममध्ये सुप्रिया सुळेंचं 'रिपोर्टिंग'
वाहतूक कोंडीत अडकलेल्यांच्या सरकारला लाखोल्या
सलगच्या सुट्ट्या असताना उद्घाटन करणं महागात
वाहतूककोंडी झाल्यानं सरकारकडून जनतेची माफी
मिसिंग लिंकमुळे वाहतूक कोंडी कायमची संपणार?