Mumbai Potholes : मुंबईत केवळ 500 खड्डे? महापालिकेच्या दाव्यावर मुंबईकरांचा संताप ABP Majha
वेदांत नेब, एबीपी माझा | 26 Sep 2021 07:54 PM (IST)
मुंबई महापालिका अंतर्गत येणाऱ्या रस्त्यावर पडलेल्या खड्यांचा आकडा किती? असा प्रश्न पडण्याचा कारणं म्हणजे मुंबईतील खड्यांच्या प्राप्त तक्रारीची आकडेवारी...बीएमसी पोर्टलवर मुंबईत खड्याच्या एकूण 927 तक्रारी आल्या असून त्यातील चारशेच्या जवळपास खड्डे बुजविल्याचा दावा बीएमसीने केलाय. त्यामुळे बीएमसी पोर्टलवरील माहितीनुसार मुंबईत फक्त पाचशेच्या जवळपासच खड्डे बुजविण्याचा काम बाकी राहिलाय? चला तर मुंबईतले मोजता आले तर खड्डे मोजूया...