Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report

आपले पोलीस एखाद्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी खिशात ड्रग्जच्या पुड्या टाकतात? हा प्रश्न कदाचित आपल्या राज्याच्या पोलीस महासंचालकांना, राज्यभरातल्या पोलीस आयुक्तांना, पोलीस अधीक्षकांना, पोलीस निरीक्षकांना.... एकूणच सगळ्या पोलिसांना खटकेल...मात्र हा प्रश्न जन्माला घातलाय तो एको पोलिसानेच.... आणि त्या पोलिसाची पोलखोल केलीय एका अठरा वर्षाच्या तरूणानं... अंगावर खाकी वर्दी असताना... ऑन ड्युटी असताना... तरूण आंदोलकांना धमकावणारा तो पोलीस आहे तरी कोण? आणि त्या पोलिसाच्या कारनाम्यामुळे विरोधकांनी सरकारवर कशाप्रकारे आरोपांची लाठी उगारलीय? पाहुयात आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे यांचा हा स्पेशल रिपोर्ट....
आंदोलकांना,पचास पचास ग्राम पावडर...
म्हणजेच, ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी देणारा हा आहे पवन सांगळे...
महाशय मुंबईच्या सायन पोलीस ठाण्यातील चालक पदावर कार्यरत होते...
तरूणांची 'जिंदगी बरबाद' करण्याची भाषा करणाऱ्या या पवान सांगळेचंच आयुष्य आता बरबाद होण्याची वेळ आलीय..
कारण हा धमकीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचं पोलीस दलातून निलंबन करण्यात आलंय...
दिल्लीतल्या सोमवारच्या आंदोलनात,
पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्रात काल ठिकठिकाणी तरूण रस्त्यावर उतरले होेते
मुंबईच्या चेंबूरमध्ये देखील वेगवेगळ्या संघटनांच्या तरूणांनी एकत्र येत आंदोलन केलं
यातील काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
आंदोलकांची धरपकड करून त्यांना पोलिसांच्या गाडीत ठेवलं असता, चालक पवन सांगळेनं तरूणांना धमकवायला सुरूवात केली