Mumbai : ना कागद.. ना फाईलचा पसारा... सर्व रुग्णालये पेपरलेस करण्याचा निर्धार, वेळेसोबत कागदांची बचत
प्रशांत बढे, एबीपी माझा | 28 Sep 2021 06:48 PM (IST)
अस म्हटलं जातं की 21 वे शतक हे भारताचे शतक आहे. भारतात आलेल्या डिजिटल क्रांतीमुळे अनेक तरुणांना नवीन संधी उपलब्ध होत आहेत.अमेरीकेची नोकरी सोडून मायदेशांत परत येऊन आरोग्य सेवेत डिजिटल क्रांती घडवण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या दोन तरुणांनी आज रुग्णालयांना डिजिटल क्रांतीशी जोडले आहे.आणि ही क्रांती आता पर्यंत किमान २०० झाडांची कत्तल रोखू ही शकली आहे...काय आहे ही क्रांती पाहूया हा एबीपी माझा ची विशेष रिपोर्ट..