Mumbai Metro 3 : मुंबईच्या पोटातून प्रवास, सुसाट, गारेगार ; मेट्रो 3 मार्गिकेचा ग्राऊंड रिपोर्ट Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईच्या पोटातून गारेगार प्रवास करण्याचं मुंबईकरांचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे...भुयारी मेट्रोच्या बीकेसी ते आरे या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. हा एक तासांचा प्रवास कसा असेल, त्याचं तिकीट काय आहे...आणि मेट्रोस्टेशन कसं सज्ज झालंय...तुमच्यासाठी मेट्रोची ही खास सफर...
मुंबईकरांची मेट्रो 3 मार्गिका कशी असणार?
मेट्रो 3 मार्गिका भूमिगत असणार आहे. ही मेट्रो प्रायोगिक चाचणीत 65 किमी प्रतितास वेगानं धावणार आहे. सध्या या मेट्रोचा 5 ते 10 किमीचा ट्रायलरन करण्यात येतोय. दरम्यान मेट्रोची क्षमता ही 100 किमी प्रतितास प्रवास धावण्याची आहे. ही संपूर्ण मेट्रो भारतीय बनावटीची असून आंध्र प्रदेशमधील श्री सिटी येथे ही मेट्रो बनवण्यात आलीये. मुंबईत मेट्रो 3 च्या सध्या 12 गाड्या दाखल झाल्या आहेत. या मेट्रोचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे ही मेट्रो ड्रायव्हरलेस असणार आहे.
मेट्रोच्या स्थानकांचं जवळपास 100 टक्के काम पूर्ण झालंय. मेट्रोत प्रवेशाकरता फलाटावरच फुल स्क्रीन डोअर असणार आहे. रुळांवरचे अपघात किंवा आत्महत्येची 0 टक्के शक्यता यामध्ये असणार आहे. तसेच ही स्थानकं इंडिकेटर, एक्सलेटर,सीसीटीव्ही यांसारख्या सुविधांनी अद्यायावत असतील. मेट्रोच्या फलाटावर लिफ्टची सोय करण्यात आलीये. दिव्यांगांकरता विशेष शौचालय, बेबी डायपर चेंजींग रुम मोफत इंटरनेट, वायफाय सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.