Mumbai Local | कल्याण स्टेशनवरच्या प्रवासाची जीवघेणी कसरत, प्रवाशांचे 'अच्छे दिन' कधी? Special Report

Mumbai Local | कल्याण स्टेशनवरच्या प्रवासाची जीवघेणी कसरत, प्रवाशांचे 'अच्छे दिन' कधी? Special Report
खिशाला परवडणारा आणि वेळ वाचवणारा प्रवास म्हणून मुंबईकर लोकल प्रवासाला पसंती देतात...
मात्र हाच लोकल प्रवास सध्या मुंबईकरांच्या जीवावर उठतोय. कल्याण वरून बदलापूरच्या दिशेनं जाणाऱ्या लोकलमध्ये असाच प्रकार घडलाय.
वादामुळे एका महिलेनं लोकलमध्ये चढलेल्या एका तरुणीला तिचे केस ओढून खाली खेचलंय.
सुदैवानं लोकल स्लो असल्यानं ती दुखापतीपासून थो़डक्यात बचावलीय. पाहुयात रिपोर्ट...
मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकलचा प्रवास दिवसेंदिवस भयंकर होत चाललाय...
ही दृश्य आहेत कल्याण रेल्वे स्थानकातली...
लोकल पकडण्यासाठीची ही जीवघेणी चढाओढ...
पण हीच चढाओढ दिवसेंदिवस हाणामारीपर्यंत जाऊ लागलीय.
कल्याण स्टेशनवरून बदलापूरला जात असताना
लोकल पकडण्यावरून या महिलांमध्ये वाद झाला...
आणि लोकल सुरू झाल्यावर प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या महिलेनं या तरुणीचे केस
ओढले...
लोकल सुरू झाली... पण सुदैवानं ही तरुणी प्लॅटफॉर्मवरच उतरली...