Mumbai Illegal Hoardings Special Report : मुंबईतील अनधिकृत होर्डिंग्जना अभय कुणाचं? ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतल्या रस्त्या रस्त्यांवर मृत्यूचे सापळे पहायला मिळतायत.. आम्ही बोलतोय मुंबईतल्या अनधिकृत होर्डिंग्जबद्दल.. घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेला १३ दिवस उलटले तरी अद्याप अनधिकृत होर्डिंग्ज जैसे थेच आहेत.. अजून किती दुर्घटना घडल्यावर प्रशासनाला जाग येणारेय? अजून किती जीव गेल्यावर अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई होणारेय? हाच प्रश्न सध्या उपस्थित होतोय.
मुंबई: अचानक आलेल्या पावसानंतर घाटकोपरमध्ये भलंमोठं होर्डिंग कोसळून (Ghatkopar Hoarding Collapsed Case) त्याखाली 17 जणांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. आता ते होर्डिंग पडण्याचा नेमकं कारण काय हे जाणून घेण्यासाठी मुंबई महापालिकेने व्हीजेटीआय संस्थेला पत्र लिहिलं आहे. या दुर्घटनेमागे नेमकं कारण काय हे शोधण्यासाठी महापालिका आता व्हीजेटीआय या संस्थेची मदत घेणार आहे.
महापालिका प्रशासनाने व्हिजेटीआय संस्थेच्या संरचनात्मक अभियांत्रिकी (स्ट्रक्चरल इंजिनिअरींग) विभागाच्या प्रमुखांना पत्र पाठवलं आहे. घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला असून अजून 20 ते 30 जण त्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा दुर्घटनेची भविष्यात पुनरावृत्ती होवू नये यासाठी काळजी घेण्यात येणार आहे. या दुर्घटनेमागचे तांत्रिक कारण शोधण्यासाठी महापालिकेडून अभ्यास करण्यात येणार आहे.
या प्रकरणी अभ्यास करून लवकरात लवकर अहवाल सादर करावाअसे पत्र उपायुक्त (विशेष) किरण दिघावकर यांनी व्हीजेटीआयच्या संरचनात्मक अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख केशव सांगळे यांना पाठवले आहे. व्हीजेटीआयमधील तज्ज्ञांची टीम आता यामागचं तांत्रिक कारण शोधून हा अहवाल मुंबई महापालिकेला सादर करणार आहे.