Mumbai : मुंबईत हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, टीव्ही इंडस्ट्रीमधील कोणती मोठी नावं समोर?
दीपेश त्रिपाठी | 23 Aug 2021 11:22 PM (IST)
मुंबई : अभिनय विश्वाला कुठलं ग्रहण लागल आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय आणि हा प्रश्न उपस्थित होण्याचा कारण आहे अभिनय विश्वातील समोर येणारी काळी बाजू.. काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमध्ये ड्रग्जचे जाळे कसे पसरले आहेत हे सर्वांनाच कळलं तर आता टीव्ही इंडस्ट्रीमध्ये प्रोस्टिट्यूशन रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. दोन दिवसांपूर्वी हाय प्रोफाईल प्रोस्टिट्यूशन रॅकेट उद्ध्वस्त केल्यानंतर यामध्ये आता टीव्ही इंडस्ट्रीमधील काही बडी नाव समोर येण्याची शक्यता आहे.