Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report

मुंबईत मरण स्वस्त झालंय का असा संतप्त सवाल उपस्थित केला जातोय.. त्याला कारण ठरलं आहे गेल्या काही दिवसांतील झाड कोसळण्याच्या घटना.. इतकंच नव्हे आज जवळपास दीडशे ठिकाणी अशाच घटना अनेक ठिकाणी घडल्यात.. पाहुया कुठे कुठे झाड कोसळण्याच्या घटना घडल्या
मुंबई आणि ठाणे परिसरात
आज अनेक ठिकाणी झाडं
पडल्याच्या घडल्याच्या घटना घडल्यायत.....
ठाण्याच्या कळव्यामधील खारेगाव नाक्यावर
आज सकाळी भलं मोठं झाड कोसळून
बाईकवरून प्रवास करणारे दोघेजण जखमी झाले...
स्थानिकांच्या मदतीनं दोघांनाही रूग्णालयात दाखल करण्यात आलं....
मुंबईच्या चेम्बूरमध्ये
केविक मॉलशेजारी झाड कोसळलं
त्यामुळे अनेक वाहनांचं नुकसान झालं
मुंबईच्या पवईतील हिरानंदानी परिसरात
मुसळधार पावसामुळे झाड कोसळून
चार वाहनांचं नुकसान झालं....
याच भागात दोन धावत्या रिक्षांवर झाड कोसळल्यानं
सुदैवाने जीवितहानी टळली
कल्याण पूर्वेच्या लोकग्राम भागात
झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत
दोन गाड्यांचं मोठ नुकसान झालं...
सुदैवानं या घटनेत कुणीही जखमी झालं नाही...
मुंबईच्या मलबार हिल परिसरात
भलमोठ झाड कोसळलं...
या दुर्घटनेत रस्त्याच्या कडेला असलेल्या गाडीतील चालक
थोडक्यात बचावला