Mumbai Food Poison Case : कलिंगडमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू Special Report

ज्यांनी ज्यांनी आज ही बातमी पाहिली त्यांना एक मोठं कोड पडलंय... ते म्हणजे मुंबईच्या पायधुनीतील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू नेमका कशामुळे झालाय? खरंच त्यांच्या मृत्यूसाठी बिर्याणीपाठोपाठ कलिंगड खाणं ही कृती कारणीभूत आहे की आणखी काही? असं नेमकं काय घडलं त्या कुटुंबासोबत? पाहुयात आमचे प्रतिनिधी इशान देशमुखचा हा स्पेशल रिपोर्ट
मुंबईतील पायधूनी परिसरात एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. डोकाडिया कुटुंबातील चारही सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.प्राथमिक माहितीनुसार, काल या कुटुंबात बिर्याणीचा बेत होता. चौघांनी एकत्र जेवण केल्यानंतर रात्रीच्या सुमारास त्यांनी कलिंगडही खाल्लं. मात्र, कलिंगडखाल्ल्यानंतर काही वेळातच चौघांनाही उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला.प्रकृती झपाट्याने खालावत गेल्याने चौघेही घरातच बेशुद्ध पडले. यानंतर तातडीने डॉक्टर कुरेशी यांना बोलावण्यात आलं. डॉक्टर घटनास्थळी पोहोचले तेव्हा चौघेही बेशुद्ध अवस्थेत होते.त्यानंतर सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनीही त्यावेळी त्यांच्या प्रकृतीची स्थिती अत्यंत गंभीर असल्याचं सांगितलं. दुर्दैवाने, उपचारादरम्यान चौघांचाही मृत्यू झाला.दरम्यान, या घटनेमागे फूड पॉइझनिंगचं कारण असावं असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला, तरी नेमकं कारण काय याबाबत अजूनही स्पष्टता नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून पोस्टमार्टम रिपोर्टमधून मृत्यूचं नेमकं कारण समोर येणार आहे.कलिंगडामुळे फूड पॉइझनिंग झालं की आणखी काही वेगळं कारण आहे, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. याचा आढावा घेतलाय आपली प्रतिनिधी ईशान देशमुख यांनी