Mumbai Cruise Drug Case : Aryan Khan आणखी किती दिवस तुरुंगात? आर्यनची दिवाळीही तुरुंगातच?
abp majha web team | 20 Oct 2021 09:14 PM (IST)
शाहरुख खानचा लेक आणि क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खान संदर्भातली. आर्यन खानला आज जामीन मिळणार की त्याला जेलमध्येच राहावं लागणार? अशी चर्चा आज सकाळपासून सुरु होती. पण विशेष एनडीपीएस न्यायालयानं आज आर्यनचा जामीन फेटाळला. या निर्णयाला आर्यनच्या वकिलांकडून हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय. पण आता ऐन दिवाळीच्या तोंडावर आर्यनच्या अर्जावर त्वरित सुनावणी होणार? की आर्यनची दिवाळीही तुरुंगात जाणार? हे पाहावं लागेल..