Mumbai Crime : ड्रग्ज टेस्टिंगचं किट कारवाई टाईट Special Report

ड्रग्ज सेवन केल्यानंतरही अनेक आरोपींवर कारवाई करता येत नव्हती... कारण ड्रग्जच सेवन केल्यानंतर वैद्यकीय चाचणीला होणारा विलंब... मात्र आता तसं होणार नाहीय.. कारण पोलिसांना ड्रग्ज टेस्टिंग मशीन वितरीत करण्यात आलंय.. या मशीनमुळे कोणी, किती आणि कधी ड्रग्ज घेतलंय याचा अहवाल ५ मिनिटांत मिळणार आहे... या जोडीलाच आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे एनसीबीनं आज एका आंततराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करून, तब्बल १ हजार ७४५ कोटी रूपयांचं ड्रग्ज जप्त केलंय.. या दोन्ही हत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहुयात
ड्रग्ज घेणाऱ्यांची आता खैर नाही
महाराष्ट्र दिनाला ड्रग्ज टेस्टिंग मशिनचं वितरण
कधी, कोणतं, किती ड्रग्ज घेतलं हे कळणार
५ मिनिटांत पोलिसांना अहवाल मिळणार
थुंकीचा नमुना घेऊन चाचणी
मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई
आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश
१ हजार ७४५ कोटींचं ड्रग्ज जप्त
अमित शाहांकडून एनसीबीचं कौतुक