Costal Road : कोस्टल रोडवर 'जय हो' गाण्याची धून Special Report
मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करणाऱ्या कोस्टल रोडला आता नवी ओळख मिळाली..या मार्गावर केवळ वेगाचा अनुभवच मिळणार नाही, तर प्रवाशांना आता संगीताची अनोखी मेजवानीही मिळणार आहे.. या प्रकल्पांतर्गत भारतात पहिल्यांदाच 'मेलडी रोड' ही संकल्पना राबवण्यात आली आहे. काय आहे ही नेमकी संकल्पना? पाहूयात
मुंबईकरांची ट्रॅफिकमधून सुटका करणारा...
अशी या कोस्टल रोडची ओळख..
आता कोस्टल रोडवरून प्रवास करताना मुंबईकरांना स्लमडॉग मिलेनियर गाण्यातील जय हो या गाण्याची धून ऐकायला मिळणार आहे
कोस्टल रोडवर भारतातला पहिला वहिला मेलोडी रोड उभारण्यात आलाय..
अमरसन्स गार्डन ते ब्रीच कँडी दरम्यान उत्तरेकडे जाणाऱ्या मार्गिकेवर ५०० ते ७०० मीटरचा टप्पा तयार करण्यात आलाय..
इथे रस्त्यावर विशिष्ट अशा ग्रूव्हस म्हणजेच खाचा तयार करण्यात आल्यात
जेव्हा एखादं वाहन ताशी ६० ते ७० किमीच्या वेगानं धावते तेव्हा घर्षणामुळे धून तयार होते..
जर वेग अधिक वाढवला तर ही धून ऐकू येत नाही
कोणत्या मेलोडी रोडवर कोणती धून - हेडर
कॅलिफोर्नियामध्येे 'विल्यम टेल ओव्हरचर'ची धून ऐकू येते
न्यू मेक्सिकोत ऐतिहासिक मार्ग ६६ वर 'अमेरिका द ब्युटीफुल' हे गाणे ऐकू येतं
दक्षिण कोरियात चालकांना झोप येऊ नये म्हणून 'मेरी हॅड अ लिटल लॅम्ब' ही धून वाजणारा रस्ता तयार केला आहे
हंगेरीत प्रसिद्ध रॉक बँड रिपब्लिकच्या गाण्याची धून ड्राईव्ह करताना ऐकायला मिळते
याशिवाय चीन, इराण, तैवान, इंडोनेशिया, UAE), रशिया आणि तुर्की या देशांतही म्युझिकल रोड्स आहेत बनवण्यात आलेत..
आणि आता या यादीत आपल्या मुंबईचं नाव समाविष्ट
झालंय.
तेव्हा कोस्टल रोडवरून सफर करताना जय होचे सूर नक्की ऐका..


































