Mumbai Corona : मुंबईकरांनो काळजी घ्या, तिसरी लाट वाटेवर; पुढचे 15 दिवस महत्त्वाचे Special Report
मनश्री पाठक, एबीपी माझा | 20 Sep 2021 10:38 PM (IST)
मुंबईकरांनो काळजी घ्या, तिसरी लाट वाटेवर; पुढचे 15 दिवस महत्त्वाचे; गणेशोत्सवानंतर मुंबईत कोरोना वाढणार?
दरम्यान मुंबईत गेल्या 24 तासात 419 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 447 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,19,394 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. मागील 24 तासात मुंबईत एकूण 31 हजार 880 नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. मुंबईत गेल्या 24 तासात पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4595 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1194 दिवसांवर गेला आहे.