MPSC Exam Special Report : कुणी परीक्षा घेतं का परीक्षा? घोटाळ्यांच्या मालिकांमुळे परीक्षांचे वांदे
abp majha web team | 22 Aug 2022 09:43 PM (IST)

महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षात एकामागोमाग एक उघडकीस आलेल्या भरती घोटाळ्यांमुळे लाखों विद्यार्थ्यांची उमेदीची वर्षं चाललीयत . ज्या परीक्षांमध्ये घोटाळे झालेत त्या परीक्षा पुन्हा केव्हा होणार आणि कोणत्या यंत्रणेमार्फत होणार हे अजूनही स्पष्ट नसल्याने या तरुणांचं भवितव्य अधांतरी लटकलंय...या परीक्षांसठी परिक्षा अर्जाच्या स्वरुपात कोट्यावधी रुपये विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेत.