Mohan Bhagwat on Election Result 2024 : भागवतांनी सुनावलं, कुणाला टोकलं? Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलोकसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर आता सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. अहंकार, निवडणुकीतल्या प्रचाराची भाषा, त्यामुळे समाजात द्वेष पसरण्याची भीती, मणिपूरचा हिंसाचार यासारख्या अनेक मुद्द्यांवरून भागवतांनी ताशेरे ओढलेत. त्यांचा रोख नेमका कुणाकडे याची चर्चा सुरू झालीय. पाहुयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट...
Mohan Bhagwat : राजकीय पक्षांना सरसंघचालकांच्या कानपिचक्या, सध्य परिस्थितीवरुन सर्वांना खडे बोल! नेमकं काय म्हणले मोहन भागवत?
Nagpur News नागपूर : देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुका (Loksabha Election 2024) आणि त्यांच्या निकालानंतर संघ नेतृत्वाची जाहीर भूमिका काल पहिल्यांदाच सर्वांसमोर आली. संघाच्या प्रशिक्षण प्रणालीत अत्यंत महत्वाच्या कार्यकर्ता विकास वर्गाच्या समारोपीय सोहळ्यात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी फक्त काँग्रेस किंवा इंडी आघाडीच्या पक्षांनाच धारेवर धरले नाही, तर भाजप आणि पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांना ही जोरदार कानपिचक्या दिल्या आहेत. त्यामुळे पार पडलेल्या लोकसभा निवडणुकादरम्यान सर्वच पक्षांकडून झालेला कडवा प्रचार आणि त्यानंतर आलेल्या निकालाबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाराज आहे का? असा प्रश्न या निमित्याने उपस्थित होऊ लागला आहे.