MNS Nagpur Protest : नागपुरात निघाली विनापाण्याची वरात, पाण्यासाठी मनसेचं आंदोलन
abp majha web team | 03 Jun 2023 12:00 AM (IST)
नागपूरमध्ये आज एक आगळीवेगळी वरात निघालीये... ज्यात नवरदेव होता, नवरदेवाचा घोडा होता, नाचणारे वऱ्हाडी होते, वाजंत्री होते, फटाक्यांची आतिषबाजी होती... असा सगळा लवाजमा होता... पण यात पुढे फक्त नवरी नव्हती... तर पुढे होतं पालिका कार्यालय .. पाणी प्रश्नाला घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीनं पाणीपुरवठा करणाऱ्या ओसीडब्ल्यू कंपनीची काढलेली ही वरात चर्चेचा विषय ठरली ...