Special Report : तब्बल 111 वर्षांनंतर टायटानिक रिटर्न्स!, पुन्हा एकदा टायटानिकच्या चर्चा का?
abp majha web team | 22 Jun 2023 11:50 PM (IST)
टायटानिक... हे नाव जरी ऐकलं तरी डोळ्यासमोर आयकॉनिक पोजमधला लिओनार्डो आणि केट दिसते.. अथांग समुद्राला साक्ष मानत हे दोघे आकंठ प्रेमात बुडालेले असतात.. आणि तेवढ्यात त्यांचं महाकाय जहाज एका हिमखंडाला धडकतं.. आणि त्यानंतरचा हाहा:कार... अवघ्या काही सेकंदांमध्ये डोळ्यांसमोर उभा राहतो.. चित्रपटात जे दिसलं होतं, ते १९१२ साली घडलं होतं. त्या घटनेला १११ वर्ष पूर्ण झालीएत.. मात्र, तरीही ही घटना काही विस्मरणात जात नाहीय. दरवर्षी काही ना काही असं घडतं, की ही घटना आणि त्यातलं ते टायटानिक जहाज.. पुन्हा डोकं वर काढतंं... आणि अंगावर काटा आणणाऱ्या जहाजबुडीच्या जखमा ताज्या होतात. आता यंदाही या जखमेवरील खपली काढणारी घटना घडलीय... पाहूयात... काय घडलंय नेमकं...