Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
abp majha web team | 06 Jul 2026 10:04 PM (IST)

शनिवार-रविवारी दिवसभर कोसळलेल्या पावसानं आजही उसंत घेतली नाही... जोरदार बरसणाऱ्या पावसानं मुंबई आणि पुण्याचं जनजीवन विस्कळीत केलंय... त्यातच पहाटेच्या वेळी एक्सप्रेस हायवेच्या नव्या-कोऱ्या मिसिंग लिंकवर भलीमोठी दरड कोसळली अन् राजकीय वादाला तोंड फुटलं... कारण काही महिन्यांपूर्वीच गाजावाजा करून या रस्त्याचं उद्घाटन झालं होतं अन् महायुतीत श्रेयवादही रंगल्याचं बघायला मिळालं होतं... आता दुर्घटनेमुळे हा मार्ग ठप्प झाल्यानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरत भ्रष्टाचाराचा आरोप केलाय... बघुयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट...
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाची मिसिंग लिंक...
काही महिन्यांपूर्वी मोठा गाजावाजा करून 'कनेक्ट' झालेली ही लिंक, पहिल्या पावसात 'मिस' झालीय...
लोणावळा परिसरात रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानं मिसिंग लिंकच्या बोगद्याच्या तोंडावर मोठी दरड कोसळलीये...
Continues below advertisement
- मुख्यपृष्ठ
- टीवी शोज
- स्पेशल रिपोर्ट
- Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
TRENDING VIDEOS
Continues below advertisement
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.