#Remdesivir मंत्र्यांकडून फक्त आपल्या जिल्ह्यांसाठी रेमडेसिवीर? इतर जिल्ह्यातील तुटवडा कधी संपणार?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी बेड न मिळणे, औषधं न मिळणे, ऑक्सिजन तुटवड्याच्या तक्रारी देखील येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला.
यानंतर बोलताना राजेश टोपे म्हणाले की, बेड मॅनेजमेंटसाठी मुख्य सचिवांना आदेश दिले आहेत. बेडची संख्या वाढली पाहिजे. बेड नाही हे उत्तर सहन करणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. आता 15 दिवस गॅप घेत आहोत. तर बेड वाढवले पाहिजेत. हॉस्पिटलमध्ये जागा नसेल तर चांगल्या इंस्टिट्यूटमध्ये बेड वाढवा. रुग्णालयांचे 80% बेड ताब्यात घेतले पाहिजेत. कोविड नियमावली बनवली पाहिजे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, असंही टोपे म्हणाले.