Michaung Cyclone Special Report : मिचॉन्ग चक्रीवादळाचं महाराष्ट्रावर नवं संकट 5 डिसेंबरला धडकणार
abp majha web team | 02 Dec 2023 11:24 PM (IST)

संकटांचं भूत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची पाठ सोडायचं नाव घेईना... गेल्या काही दिवसांत पडलेल्या अवकाळी पावसाने आधीच दैना करून ठेवलीय... त्यातून शेतकरी अजून सावरलेलाही नाही... तोच आता समुद्रातून एक संकट येऊ घातलंय... तेही तब्बल १ हजार २१८ किलोमीटर अंतरावरून...