Mhataricha Boot Special Report : 'म्हातारीचा बुट'ही थकलाय, बुटात प्रवेश बंदी
abp majha web team | 13 Dec 2022 11:45 PM (IST)
वाळकेश्वरच्या कमला नेहरू पार्कमधला म्हातारीचा बूट मुंबईतल्या पर्यटनाचं खास आकर्षण मानला जातो. पण तोच म्हातारीचा बूट सध्या धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळं तो पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. साहजिकच आता बच्चेकंपनीला या बुटात शिरण्याची गंमत अनुभवता येणार नाही. मुंबईत लहानाच्या मोठ्या झालेल्या अनेक पिढ्यांनी आणि मुंबईत पर्यटनासाठी आलेल्या बच्चेकंपनीनंही मोठ्या कुतुहलानं म्हातारीचा बूट पाहिला आहे. त्या बुटात शिरण्याची गंमतही त्यांनी अनुभवली आहे. सर्वसामान्य माणसापेक्षा कितीतरी पट उंच असलेला हा म्हातारीचा बूट लहानथोरांचं खास आकर्षण आहे. पण तोच म्हातारीचा बूट आता धोकादायक स्थितीत आहे.