MCA Special Report : MCA निवडणुकीत आशिष शेलारांशी लढण्याचा संदीप पाटलांचा इरादा पक्का
abp majha web team | 10 Oct 2022 11:40 PM (IST)

MCA Special Report : राज्यातल्या सत्तासंघर्षात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप-शिंदे गट एकमेकांसमोर उभे ठाकल्याचं चित्र असलं तरी, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत पवारांची राष्ट्रवादी, शेलारांची भाजप, नार्वेकर-भोसलेंची शिवसेना आणि सरनाईकांचा शिंदे गट हे सारे एकत्र आल्याचं दिसून येत आहे. शरद पवार आणि आशिष शेलार यांनी एमसीएच्या आगामी निवडणुकीसाठी संयुक्त पॅनेल दाखल केलं आहे. या पॅनेलमधून माजी कसोटीवीर संदीप पाटील यांचा पत्ता कापण्यात आला आहे. त्यामुळं एमसीएच्या अध्यक्षपदासाठी शेलार आणि पाटील यांच्या थेट सामना होणार आहे. पाहूयात एबीपी माझाचा खास रिपोर्ट