Jarange vs Fadnavis Special Report : जरांगेच्या निशाण्यावर युतीचे बॉस, प्रत्युत्तरात 'संन्यास'

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरुन आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असून मनोज जरांगे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरच गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सगळं काही द्यायचं आहे, मग सगेसोयरे असेल किंवा आरक्षण असेल पण देवेंद्र फडणवीस हे ते होऊ देत नाहीत असा मनोज जरांगे यांचा आरोप आहे, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता. त्यावर, या आरोपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच चांगल्याप्रकारे उत्तर देऊ शकतील, जर त्यांनी हे आरोप मान्य केले, तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. आता, फडणवीसांच्या प्रतिक्रियेनंतर पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना, एकनाथ शिंदे यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच, मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेत देवेंद्र फडणवीसांची मोलाची भूमिका असल्याचंही त्यांनी म्हटलं.
मनोज जरांगे यांच्याकडून होत असलेल्या आरोपाच्या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी (devendra Fadnavis) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव घेतलं. जर एकनाथ शिंदेंनी जरांगेचे आरोप खरे आहेत, असं म्हटलं तर मी राजकारणातून संन्यास घेईन असे आव्हानच फडणवीसांनी दिलं होत. त्यावर, आता स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) रोखठोक शब्दात देवेंद्र फडणवीस यांचं मराठा समाजासाठी आणि मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) असलेलं योगदान सांगितलंय.
मराठा समाजाला आरक्षण देताना, मी , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्र बसलो होतो. आम्ही विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिलं आहे. आपण मराठा आरक्षणाचा जो कायदा केला, त्यात देवेंद्र फडणवीसांची मोलाची भूमिका होती. न्यायाधीश शिंदे समिती आपण नेमली, मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार मराठवाड्यात आपण कुणबी प्रमाणपत्रही देण्यास सुरुवात केली. ज्या सवलती होत्या, तेही देण्याचं काम केलंय. आम्ही मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणास विरोध करण्यासाठी न्यायालयात कोण गेलंय, हेही अगोदर पाहावे, त्यातही विरोधी पक्षाचाच हात असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.