Manoj Jarange : कुणबी नोंदींना सराटीतच 'अंतर'? ; जरांगेंच्या घरात कुणबी नोंद नाही? Special Report
abp majha web team | 03 Jan 2024 07:14 AM (IST)
मनोज जरांगे हे गेल्या चार महिन्यापासून मराठा आरक्षणाचा लढा लढत आहेत. त्याच्या लढयामुळे महाराष्ट्रात 54 लाख कुणबी नोंदी मिळाल्याचा दावा सरकारने केला. पण अद्याप मनोज जरांगे यांच्या स्वतःच्या कुटुंबातच एकही कुणबी नोंद सापडलेली नाहीये. एवढंच नाही तर जे गाव मराठा आरक्षण लढ्याचं केंद्रस्थान बनलंय, त्या अंतरवाली सराटी गावात देखील एकही कुणबी नोंद आढळलेली नाही. त्यामुळे, जरांगेंच्या आंदोलनाची महाराष्ट्राला वळसा, मात्र काखेतच नाही कळसा, अशी अवस्था झाल्याची चर्चा रंगलीय.