Manoj Jarange Maratha Andolan : उपोषण सुटलं नेमकं काय घडलं? | ABP Majha Special Report

abp majha web team  |  17 Sep 2026 10:29 PM (IST)
ABP News

गेल्या वीस दिवसांपासून सुरु असलेलं उपोषण मनोज जरांगेंनी अखेर मागे घेतलं. मुंबईला जाणारच असा निर्धार मनोज जरांगेंनी बुधवारी संध्याकाळी व्यक्त केला होता. मात्र त्यानंतर पुढच्या काही तासातच घडामोडींना वेग आला. सरकारनं पाठवलेला ड्राफ्ट, शिष्टमंडळानं जरांगेंचा मुक्काम असलेल्या पाटोद्यात घेतलेली धाव आणि त्यानंतर मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतल्याची केलेली घोषणा.. यामुळे गेल्या तीन आठवड्यांपासून सुरु असलेल्या संघर्षात अर्धविराम आलाय. नेमकं काय घडलं, याचा आढावा घेऊया, या स्पेशल रिपोर्टमध्ये. 


आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेनं प्रवास सुरु केलेल्या मनोज जरांगेंनी अंतरवालीपासून साधारण १०० किलोमीटरवर असलेल्या पाटोद्यात उपोषण मागे घेतलं. 


पाटोद्यात सरकारचं शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे यांच्यात चर्चा झाली.


त्यानंतर आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करत उपोषण मागे घेण्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली. 


राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड, दादा भुसे आणि आमदार सुरेश धस यांच्या हस्ते लिंबू पाणी घेत जरांगेंनी २० दिवसांच्या उपोषणाची समाप्ती केली.


मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी दिलेल्या तीन महिन्यांच्या मुदतीनंतर सरकारनं धोका दिला, तर काय करायचं, याचीही घोषणा मनोज जरांगेंनी उपोषण सोडताना करून टाकली.


तर सरकारनं शब्द फिरवू नये, यासाठी सगळं काही लेखी देण्याची मागणीही जरांगेंनी केली.


उपोषण सोडल्यानंतर जरांगेंनी मुंबईत गेलेल्या १ लाख मराठ्यांना माघारी येण्याचं आवाहन केल्यामुळे इतक्या मोठ्या संख्येनं आंदोलक पुढे गेले असल्याची बाब पहिल्यांदाच समोर आली.


तर जरांगेंनी उपोषण सोडल्यामुळे मिळालेला दिलासा आणि आनंद मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.


मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर विरोधी पक्षांनी मात्र त्यांच्यावर जोरदार आरोप सुरु केलेत.


जरांगेंच्या आंदोलनामागे आर्थिक व्यवहार असल्याचा आरोप करत सरकार आणि त्यांचं साटंलोटं असल्याचा आरोप काँग्रेस नेते वडेट्टीवारांनी केलाय. 


तर मनोज जरांगेवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या बारस्कर महाराजांनी ईडीच्या धाकानं उपोषण सोडल्याचा आरोप केला.


तर ज्यांच्यावर टीका केली, त्याच नेत्यांच्या हातून उपोषण सोडणं खटकल्याचं सांगत एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी जरांगेंच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केलीय.


जरांगेंचं उपोषण संपण्याचं क्रेडिट एकनाथ शिंदे आणि उदय सामंतांना देत गुणरत्न सदावर्तेंनीही यामागे सेटिंग असल्याचा आरोप केलाय


जरांगेंनी उपोषण मागे घेतलं असलं तरी त्यांच्या मागण्या अजून पूर्ण झालेल्या नाहीत.


अंमलबजावणी घेतल्याशिवाय मागे फिरणार नाही, या भूमिकेला आवर घालत जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांची मुदत दिलीय. 


जरांगेंकडून होणारी एकेरी टीका, शिवराळ भाषा आणि राजकीय आरोपांमुळे गाजलेल्या या आंदोलनानंतर पुढच्या तीन महिन्यात नेमकं काय घडतं आणि मराठा समाजाच्या पदरात नेमकं काय घडतं... 

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Manoj Jarange Maratha Andolan : उपोषण सुटलं नेमकं काय घडलं? | ABP Majha Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA