Anti-Naxal Operation : नक्षलवादाला मोठा धक्का, चार दिवसांत शेकडो जणांचे आत्मसर्मपण Special Report
abp majha web team | 17 Oct 2025 10:18 PM (IST)
छत्तीसगड आणि महाराष्ट्रात नक्षलविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले असून चार दिवसांत सुमारे पावणेपाचशे नक्षलवाद्यांनी आत्मसर्मपण केले आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले. 'तत्कालीन जो रेड कॉरिडॉर होता, या रेड कॉरिडॉर मधलं आता संपूर्ण माओवाद हा संपुष्टात येईल आणि त्याची सुरुवात ही गडचिरोलीने आणि महाराष्ट्राने केली,' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अबुझमाड आणि उत्तर बस्तर जिल्हे नक्षली हिंसेतून पूर्णपणे मुक्त झाल्याची घोषणा केली आहे. दरम्यान, गडचिरोलीतील लॉयड मेटल्स कंपनीने आत्मसर्मपण केलेल्या माओवाद्यांना प्रशिक्षणासह नोकरी देण्याचा प्रस्ताव दिला आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आत्मसर्मपण केलेल्या नक्षलवाद्यांचे स्वागत करत त्यांना मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले आहे.