Mahayuti Mantri : PA विना मंत्री, टेन्शनफ्री मुख्यमंत्री खाजगी सचिवाच्या शोधत मंत्री Special Report

महायुती सरकारमधले सात मंत्री अस्वस्थ आहेत.. हे मंत्री भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे आहेत.. अस्वस्थ आहेत म्हणजे राजीनामा, पक्ष सोडणे वगैरे स्टाईल नाराज नाही तर खाजगी सचिव न मिळाल्याने नाराज आहेत.. पण ही नाराजी त्यांना थेट बोलूनही दाखवता येत नाहीय. फिक्सर खाजगी सचिवाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी कडक भूमिका घेतल्यामुळे हे सात मंंत्री विना सचिव काम करत आहेत. कोण आहेत हे मंत्री आणि काय आहे प्रकरण पाहुयात
((मोंटाज - फडणवीस आणि ७ मंत्री))
VO
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आपली नवी इनिंग सुरु केली त्याला सहा महिने झाले
मात्र अजुनही त्यांच्या मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना खाजगी सचिव मिळालेले नाहीत.
मंत्र्यांचे खासगी सचिवही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवणार हे सहा महिन्यांपूर्वीच स्पष्ट झाले होते.
प्रशासकीय वर्तुळात फिक्सर म्हणून ओळख असलेल्या कलंकित अधिकाऱ्यांना, मंत्र्यांचे ओएसडी किंवा पीए म्हणून नेमू देणार नाही असं स्वत:फडणवीसांनी कडक शब्दांत सांगितले होते.
BITE - फडणवीस जुना बाईट लायब्ररीत फोल्डरमध्ये टाकला आहे
VO
मंत्र्यांनी नियुक्त केलेल्या खाजगी सचिवांना मुख्यमंत्र्यांनी नाकारल्याने
महायुती सरकारमधील
सात मंत्री अजून खाजगी सचिवाविनाच कारभार करत आहेत.
यात सर्वाधिक चार मंत्री शिवसेनेचे आहेत
तर दोन मंत्री राष्ट्रवादीचे.
उदय सामंत, शंभूराज देसाईं, गुलाबराव पाटील आणि संजय राठोड या
शिवसेनेच्या चार मंत्र्यांना सरकारकडून खाजगी सचिव मिळालेले नाहीत
भाजपचे गणेश नाईकही सध्या खाजगी सचिवाविनाच आहेत
तर राष्ट्रवादीच्या दत्ता भरणे आणि छगन भुजबळांनाही खाजगी सचिव मिळालेले नाहीत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र माध्यमांना लक्ष्य करत हा मुद्दा सुद्धा हवेत उडवून लावला.
BITE - फडणवीस
etxm palghar cm on matri pa byte 160625 MR
VO
मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडून खाजगी सचिव (पीएस) किंवा विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) म्हणून नियुक्तीसाठी पाठवलेल्या १२५ नावांपैकी १०९ जणांना या आधी डिसेंबरमध्ये फडणवीसांनी मान्यता दिली होती.
काही मंत्र्यांचे काही खाजगी सचिव प्रशासनात "फिक्सर" म्हणून ओळखले जातात अशा १६ जणांना मंजुरी नाकारली होती. तेव्हापासून हे सात मंत्री खाजगी सचिवाच्या शोधात आहेत.
जोवर सीएम ऑफिस मान्यता देत नाही तोवर या मंत्र्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत राहावा लागणार हे नक्की
ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा