Mahayuti on Palika Election : महायुतीतल्या अंतर्गत लढाईत कुणाची सरशी? Special report
कुठे युती आणि आघाड्या... कुठे वैर विसरुन हातमिळवणी... तर कुठे नाराजीचं नाट्य. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वात महत्त्वाची मानली जाणारी महापालिकेली लढाई. याच लढाईसाठी राज्यातील २९ महापालिकांच्या प्रभागांमध्ये सध्या जोरदार घडामोडी सुरु आहेत. मात्र सर्वात महत्त्वाचं हे की या मनपा निवडणुकीत काही ठिकाणी चक्क देवेंद्र फडणवीस विरुद्ध शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी अशी लढाई होणार आहे. कोणत्या महापालिकांमध्ये हे चित्र आहे? आढावा घेऊयात या खास रिपोर्टमधून...
फडणवीस...
एकनाथ शिंदे...
आणि अजित पवार...
महायुतीचे महत्वाचे चेहरे...
मात्र महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी
देवाभाऊ म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका बाजूला
आणि दुसऱ्या बाजूला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची
म्हणजेच एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची युती असं चित्र पाहायला मिळतं...
जे नाशिकमध्ये घडलं तेच सोलापुरात...
सोलापूर महापालिकेत पाच वर्ष भाजपची सत्ता होती...
मात्र आता सोलापूर महापालिकेत भाजपविरोधात शिंदेंची शिवसेना
आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र आली आहे....
लातूरमध्येही महायुतीत मोठा पेच पाहायला मिळाला...
जागावाटपाचा तिढा न सुटल्यानं इथे राष्ट्रवादी आणि शिंदेसेना
वेळ पडल्यास भाजपविरोधात लढताना
शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही सोबत घेण्याच्या भूमिकेत आहे